Tuesday 25 February 2020

झोका

झोका
चल गं सई
घेऊ झोका
बांधून घट्ट
दोरी टाका

झर झर
झोका वर
आनंदाला
येई भर

फांद्यासह
झाड हले
जणू बाईचे
केस खुले

वर झोका
वाटे गार
मोद मिळे
किती फार

डौलात उभं
वडाचं झाड
पानापानात
भरली याद

आमराई ती
गावा बाहेर
आठवे सई
असं माहेर

• रघुनाथ सोनटक्के

दै. युवा छत्रपतीमधे प्रकाशित 

Monday 24 February 2020

ससा


ससा
एक ससा
मळ्यात घुसला
मुळा, गाजर
खातच बसला

तो तर फारच
होता भित्रा
मुळे खाण्यात
खुपच चतरा

कापसासारखा
त्याचा रंग
खाण्यात खुप
झाला दंग

शेतात आज
आलाय बाळू
पेरू हाताने
लागला तोडू

आवाज सशाला
आलाय हळू
धुम ठोकत मग
लागला पळू


आवाज सशाला
आलाय थोडा
धूम ठोकतच
चला पळा

• रघुनाथ सोनटक्के

२३ फेब्रुवारी २०२० च्या दै. विदर्भ मतदार मधे प्रकाशित

Raghunath Sontakke