« बगळा »
पांढरा शुभ्र बगळा
लावतो मस्त ध्यान
पाण्यात लक्ष ठेवून
दाखवतो हा शान
एक पाय दुमडून
राहतोय उभा
भोळसर माशांना
देतोय दगा
कोयत्यासम वाकडी
आहे त्याची मान
पाणथळ ठिकाणी
त्याचे वस्तीस्थान
घाबरतात त्याला
बेडकं लहान
पळतात कशी
वाचवत प्राण
पिवळी-धम्म चोच
बाकी शुभ्र सगळा
नदीकाठी दिसतो
असा हा बगळा
• रघुनाथ सोनटक्के
२५ डिसेंबर २०१८ च्या साप्ताहिक सायबर क्राईम तसेच २८ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित
२ जानेवारी २०१९ च्या दै. कार्यारंभ मधे प्रकाशित (http://karyarambh.com/beed/20190102/1/5/beed.html)
६ जानेवारी २०१९ च्या दै. महाराष्ट्र टाईम्स (संवाद) मधे प्रकाशित
No comments:
Post a Comment