निसर्गाचा खेळ
पहाटे पहाटे
डोंगराच्या मागे
लालेलाल सुर्य
आग धगधगे
हिरवे डोंगर
झाडांची नक्षी
मधूर गाणे
गाती पक्षी
काळोख्या रात्री
असंख्य तारे
चांदोबा सवे
चमकती सारे
नभाच्या पटावर
चांदोबा खडू
खाटेवर झोपत
रेघोट्या ओढू
शुभ्र, दुधी ढग
आकाश निळे
दिनरात निसर्गाचा
खेळ हा चाले
• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. ८८०५७९१९०५
१८ जाने २०२० च्या दै. युवा छत्रपती मधे प्रकाशित
६ फेब्रुवारी २०२० च्या साप्ता. लोकसंकेत मधे प्रकाशित
२६ जानेवारी २०२० च्या दै विदर्भ मतदार मधे प्रकाशित
२३ फेब्रुवारी २०२० च्या दै.तरुण भारत (नागपूर) मधे प्रकाशित
११ फेब्रुवारी २०२० च्या मधुरिमा मधे प्रकाशित
चिंच, बोरं खाऊन
आला मला खोकला
आजीच्या सांगण्याने
दवाखाना गाठला
हळदीचे दुध आणि
आल्याचा चहा
दिवसातून दोनवेळा
म्हणे प्यायला हवा
दही खायला बंदी
नको आंबट फळे
वाढेल मग ढास
आणखी त्याच्यामुळे
चाॅकलेट्स झाली बंद
आईस्क्रीम मिळेना
साधंसरळ जेवन
मला मग गिळेना
आजी म्हणे आईला
छान लक्ष दोघं ठेवा
कोमट पाण्याचा शेक
याला द्यायला हवा
खाऊ नका थंडीचे
आंबट आणि गार
खोकल्याने नाकी नऊ
आणले मला फार
सिरप, गोळ्या देऊन
डाॅक्टरही दमला
आजीच्या नुस्क्यानी
खोकला मग थांबला
• रघुनाथ सोनटक्के
८ जाने २०२० च्या साप्ताहिक सायबर क्राईम मधे प्रकाशित.
१५ मे २०२०, दै. युतीचक्र आणि आदर्श महाराष्ट्र