Wednesday, 13 May 2020

झाड

झाडं
हिरवं हिरवं झाड
पिवळी पिवळी फुलं
वार्‍याची मंद झुळूक
डोलतात कानी डूलं

हिरवं हिरवं झाड
पाऊस पडे रे खुप
अंगाचीही लाही लाही
थांबे धरतीची धूप

हिरवं हिरवं झाडं
विसावे पक्ष्यांचा थवा
गोड फळांचा खाऊ
सर्वांनाच वाटे हवा


हिरवं हिरवं झाड
पिल्लासाठी खोपा
सावलीत सारे
निवांत चला झोपा

हिरवं हिरवं झाड
गोड गोड फळ
खाता खाता मस्ती
येई आम्हा बळ
• रघुनाथ सोनटक्के
 १४ मे २०२०, जनमाध्यम 
१४ मे २०२०, दै. युतीचक्र आणि  आंदर्श महराष्ट्र 

No comments:

Post a Comment