काय हा पाऊस
काय हा पाऊस, घरातच बसा
चिकचिक बाहेर, हातपाय पुसा
चिकचिक बाहेर, हातपाय पुसा
बरसत राहतो, थोडी ना उसंत
सुरवात आवडे, मग नापसंत
रिमझिम कधी, कधी बदाबदा
रेनकोट, छत्री, ठेवा हो सदा
मैदानही ओले, घरातच खेळा
गप्पा, गाणी, बिछान्यात लोळा
शाळेच्या अंगणात, भरलीत तळी
सुटीच्या मोहाने, खुललीच कळी!